Home क्राईम कागल येथे वेदगंगा नदीत यात्रेकरीता आलेल्या चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

  कागल येथे वेदगंगा नदीत यात्रेकरीता आलेल्या चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

  102
  0

  पुणे दिनांक १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील वेदगंगा नदीतील बस्तवडे बंधा-यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार जणांचा बुडून दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.हे सर्वजण कागल येथे पाहुण्यांच्या घरी यात्रे निमित्ताने आले होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने यातील दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.तर एक जणांचा मृतदेहाचा शोध सुरू आहे.

  या नदीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावे या प्रमाणे आहेत.१) जितेंद्र विलास लोकरे (वय ३६ रा.मुरगुड) २) रेश्मा दिलीप येळमल्ले ( वय ३४ रा.अथणी . कर्नाटक) ३) सविता अमर कांबळे ( वय २७ रा.रुकडी ४) यश दिलीप येळमल्ले ( वय १७ रा.अथणी . कर्नाटक) हे सर्वजण कागल तालुक्यातील आणूरमध्ये यात्रे करीता पाहुण्यांच्या घरी आले होते.नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असता चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

  Previous articleमुंबईतील घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटना प्रकरणी भावेश भिंडेला दहा दिवसांची पोलिस कस्टडी
  Next articleशहीद कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here