Home क्राईम नवी मुंबईत नववी पास युवकाने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून टाकला बनावट नोटांचा कारखाना.पोलिसानी...

    नवी मुंबईत नववी पास युवकाने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून टाकला बनावट नोटांचा कारखाना.पोलिसानी आवळल्या मुसक्या

    206
    0

    पुणे दिनांक १९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नवी मुंबईतील तळोजा परिसरात राहणाऱ्या एका नवी पास युवकाने यूट्यूबवर व गुगलवर सर्च करुन नोटा छापण्या बाबतचा व्हिडिओ पाहून त्यांने बनावट नोटा बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. तसेच लाखो रुपयांच्या नोटा त्यांने चलनात देखील आणल्या दरम्यान या बनावट नोटांचा कारखान्यांवर मुंबई पोलिसांनी 👮 छापेमारी करून हा कारखाना सील करून प्रफुल्ल पाटील ( वय २४ रा.तळोजा .नवी मुंबई) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई येथील तळोजा परिसरात नवी पास असलेल्या प्रफुल्ल पाटील यांने बनावट नोटांचा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी 👮 सदरच्या कारखान्यावर छापेमारी करून हा कारखाना सील करून त्याला अटक करण्यात आली आहे.यात संगणक व प्रिंटर व त्यांच्या घरातून दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.मागील चार महिन्यांपासून हा कारखाना सुरू होता.यात त्यांने लाखो रुपये चलनात आणले आहे. यात १०.२०.५०.१००.व २०० एकूण १ हजार ४४३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.पोलिस तपासात त्यांने सांगितले की.तो मागील काही वर्षांपासून आर्थिक चणचणित होता.तो कुटुंबापासून वेगळे राहत होता.नंतर त्यांने बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता.दरम्यान त्याच्या नोटा बाबत एका दुकान चालकाला संशय आला.व त्यांने या बाबत पोलिसांना माहिती दिली होती.त्यानंतर प्रफुल्ल पाटील यांच्या बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याची पोलखोल झाली व पोलिसांनी 👮 बनावट नोटांचा कारखाना सील करून त्यांच्या आता मुसक्या आवळल्या आहेत.

    Previous articleभाविकांच्या धावत्या बसला भीषण आग 🔥 बस पेटल्याने आठ जणांचा मृत्यू तर होरपळून २४जण गंभीर रित्या भाजले
    Next articleपुण्यात हाॅटेलला लागली भीषण आग 🔥 सिलिंडर बाहेर काढल्यांने मोठी दुर्घटना टळली

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here