पुणे दिनांक १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे ते सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथील कवडी पाट येथील गुलमोहर मंगल कार्यालयाजवळ भल्ले मोठे होर्डिंग हे या भागात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने बॅंडपथकावर कोसळून यात बॅंडपथकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तर या ठिकाणी एका झाडाला बांधलेला 🐎 घोड्यांच्या अंगावर देखील हे होर्डिंग कोसळले यात घोडा देखील जखमी झाले आहेत.तसेच या कोसळलेल्या होर्डिंग खाली मंगलकार्यालया जवळ असलेली ३ ते ४ वाहने देखील दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्मान हे कोसळलेले हे होर्डिंग अनाधिकृत असल्याचे समजते आहे.