Home फायर पुण्यात हाॅटेलला लागली भीषण आग 🔥 सिलिंडर बाहेर काढल्यांने मोठी दुर्घटना टळली

पुण्यात हाॅटेलला लागली भीषण आग 🔥 सिलिंडर बाहेर काढल्यांने मोठी दुर्घटना टळली

136
0

पुणे दिनांक १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील खराडी भागातील लार्गो पिझ्झा 🍕 हाॅटेलमध्ये आज शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर आगीची माहिती येरवडा अग्निशमन दलाला दिल्यानंतर त्यांनी या आगी वर नियंत्रण मिळवले आहे.सदरच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

दरम्यान याप्रकरणी येरवडा अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील खराडी भागातील लार्गो पिझ्झा हाॅटेल मध्ये 🔥 आग लागल्या संदर्भात त्यांना काॅल आला होता.त्या नंतर तातडीने येरवडा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन हाॅटेल मध्ये कोणीही कामगार नसल्याची खात्री करून आग आटोक्यात आणली आहे.दरम्यान हाॅटेलच्या किचन मधून सहा सिलिंडर तातडीने बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान या आगीत हाॅटेल मधील सर्व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून खाक झाले आहे.

Previous articleनवी मुंबईत नववी पास युवकाने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून टाकला बनावट नोटांचा कारखाना.पोलिसानी आवळल्या मुसक्या
Next articleपुण्यात भरदिवसा सराफांच्या दुकांनावर दरोडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here