Home फायर चाकण -शिक्रापूर महामार्गावर गॅस टॅंकरचा मोठा स्फोटांनी परिसर हादरला व घराची पडझड

चाकण -शिक्रापूर महामार्गावर गॅस टॅंकरचा मोठा स्फोटांनी परिसर हादरला व घराची पडझड

874
0

पुणे दिनांक १९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील चाकण ते शिक्रापूर महामार्गावर गॅस टॅंकरचा भीषण असा स्फोट झाला आहे.हा स्फोट एवढा मोठा होता की स्फोटामुळे एक किलोमीटरचा परिसर हादरला व अनेक घरांची पडझड झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास मोहितेवाडी भागात ही घटना घडली आहे.दरम्यान या स्फोटात सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.मात्र या भागातील मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे.टॅंकरचा स्फोट झाल्याने आजुबाजूला उभ्या असणाऱ्या इतर वाहनांना देखील 🔥 आग लागली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान व पोलिस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व गॅस टॅंकर व इतर वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणली आहे.दरम्यान या स्फोटा बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथम गॅस टॅंकरमधून गॅस गळती झाली.व नंतर 🔥 आग लागून टॅंकरचा स्फोट झाला आहे.या घटनेनंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे.ही घटना चाकण – शिक्रापूर येथील मोहिते वाडी भागात असणाऱ्या एका धाब्यावर आज रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.दरम्यान या टॅंकरचा स्फोट झाल्यानंतर यांचा आवाज एक किलो मीटर परिसरात घुसला आहे.व अनेक घराच्या काचा फुटल्या व घरांची पडझड झाली आहे.या स्फोटाचा आवाज भयानक होता.त्यामुळे या भागातील नागरिकांच्या 👂 कानठळ्या बसल्या आहेत.व त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली व ते भयभीत झाले.सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.या घटनेचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Previous articleबंगळुरू येथे पाऊस सुरू खेळ थांबला
Next articleपुणे रेल्वे स्टेशनसह सांगली व अन्य पाच रेल्वे स्टेशन बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी.संशयित आरोपीच्या पोलिसांनी 👮 मुंबईतून आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here