Home क्राईम पुणे रेल्वे स्टेशनसह सांगली व अन्य पाच रेल्वे स्टेशन बाॅम्बच्या सहाय्याने उडवून...

  पुणे रेल्वे स्टेशनसह सांगली व अन्य पाच रेल्वे स्टेशन बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी.संशयित आरोपीच्या पोलिसांनी 👮 मुंबईतून आवळल्या मुसक्या

  600
  0

  पुणे दिनांक १९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार एक खळबळजनक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादराविणारी आहे.पुणे रेल्वे स्टेशनसह सांगली मिरज कोल्हापूर व सोलापूर रेल्वे स्टेशन बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देणार असा धमकीचा फोन सांगली 👮 पोलिसांना आला या फोन नंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरावणारी ही घटना उघडकीस आल्या नंतर या परिसरात एकच खळबळ उडाली.तसेच पोलिसांची देखील एकच तारांबळ उडाली उडाली.पोलिसांनी तातडीने तपासाचे सुत्र हालवली धमकीचा फोन करणा-या व्यक्तीच्या मुंबई येथून मुसक्या आवळल्या आहेत.

  दरम्यान या प्रकरणी मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सांगली शहर पोलिसांनी आरोपीला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुसक्या आवळल्या आहेत.धमकीचा फोन करणा-या व्यक्तींचे नाव सचिन मारुती शिंदे असे आहे. हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे रहाणारा आहे.पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.याने सांगली पोलिसांना शनिवारी फोन करून सांगली.मिरज.पुणे.कोल्हापूर व सोलापूर ही पाच रेल्वे स्टेशन बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी दिली होती.

  Previous articleचाकण -शिक्रापूर महामार्गावर गॅस टॅंकरचा मोठा स्फोटांनी परिसर हादरला व घराची पडझड
  Next articleपुण्यात खडकवासला येथे पीएमपीएल बसला लागली 🔥 आग

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here