Home राजकीय महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला झाली सुरुवात.पोलिसांचा कडक बंदोबस्त

  महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला झाली सुरुवात.पोलिसांचा कडक बंदोबस्त

  195
  0

  पुणे दिनांक २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आज सोमवार दिनांक २० मे रोजी सकाळी सुरुवात झाली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात मतदान केंद्रावर 👮 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्राचे एकूण १३ जिल्हे आहेत.यात एकूण २६४ उमेदवार हे आपले भवितव्य आजच्या निवडणूकीसाठी अजमावत आहे.या सर्व मतदान केंद्रावर १०० मिटर परिसरात कुणालाच प्रवेश देण्यात आला नाही.

  दरम्यान आज लोकसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात होणा-या मतदान यात एकूण सहा राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४९ जागेवर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली आहे.यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघ तर उत्तर प्रदेशातील १४ . पश्चिम बंगाल मधील ७ . बिहार मधील ६ झारखंड मधील ३ तर ओडिशातील ५ जम्मू काश्मीर व लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होत आहे.

  Previous articleपुण्यात खडकवासला येथे पीएमपीएल बसला लागली 🔥 आग
  Next articleठाणे पालघर व सिन्नर मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड तर ठाण्यात बोगस मतदान

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here