Home क्राईम रत्नागिरी येथील जगबुडी नदीत पाचजण बुडाले

    रत्नागिरी येथील जगबुडी नदीत पाचजण बुडाले

    218
    0

    पुणे दिनांक २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार रत्नागिरी येथील खेड तालुक्यातील तुंबड येथील जगबुडी नदीत पाचजण बुडालेल्या धक्कादायक घटना घडली असून हे सर्वजण पोहायला गेलेले होते.यातील पाच पैकी दोंघाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे तर अन्य तीन जणांना वाचविण्यात यश आले आहे.

    दरम्यान नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोंघाजणाची नावे १) सौरभ हरिश्र्चंद्र नाचरे (वय १९ रा.पन्हाळजे ) २) अंकेश संतोष भागणे ( वय २० रा.बहिरवली ) अशी आहेत.आज दुपारी सौरभ व अंकेश यांच्यासह अभय पांडुरंग भागणे.महेश मारुती गमरे.मयंक प्रकाश बाणाईत हे सर्वजण जगबुडी नदीत पोहायला गेले होते.दरम्याध पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते सर्वजण बुडाले यातील तीन जण बोटी प्रर्यत पोहचल्याने ते वाचले तर अन्य दोघेजण हे बुडाले त्यांचा स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढले आहे.दरम्यान या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    Previous articleसहा वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना करता येणार मतदान
    Next articleपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी फरार बिल्डरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 संभाजीनगर येथून आवळल्या मुसक्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here