पुणे दिनांक २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आज सर्वत्र लोकसभा निवडणुकी साठी मतदान होत आहे.अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार हे रांगेत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी उभे आहेत.तसेच मतदान देखील संथगतीने सुरू आहे.तर कही मतदार हे मतदान न करता घरी परतले आहेत.अनेक राजकीय पक्षांच्या वतीने संथ मतदान होत असल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे मेलवर तक्रारी केल्या आहेत.या नंतर आता सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सहा वाजेपर्यंत रांगेत उभे असणां-या मतदारांना मतदान करता येईल असे निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.