Home क्राईम पुणेकर नागरिकांच्या रेट्यामुळेच हिट अँड रन कारवाईला स्पीड! बार मालकासह एकूण पाच...

  पुणेकर नागरिकांच्या रेट्यामुळेच हिट अँड रन कारवाईला स्पीड! बार मालकासह एकूण पाच जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

  231
  0

  पुणे दिनांक २१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे येथील कल्याणीनगर येथे रविवारी पहाटे पासिंग न झालेल्या पोर्श कारने दुचाकी बाईकस्वारला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन आयटी इंजिनियर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या अपघातात १) अश्र्विनी कोष्टा व २) अनिश अवधिया अशी त्यांची नावे आहेत.अपघातानंतर स्थानिक नागरिक यांनी बिल्डरच्या मुलांची सामुहिक धुलाई करून त्याची नशा उतरवली व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते.दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांच्या रेट्यामुळेच बांधकाम व्यावसायिकांनी बेवड्या मुलाला कार चालविण्यासाठी दिली व म्हणून वडिलांवर व अल्पवयीन असून देखील पबमध्ये दारु देणा-या हाॅटेल मालकासह एकूण पाच जणांच्या मुसक्या पुणे पोलिसांनी 👮 आवळल्या आहेत.

  दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार अल्पवयीन मुलांच्या बिल्डर असलेल्या बापावर बेड्या मुलाला चार चाकी वाहन पोर्श कार चालविण्या साठी दिली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.त्या नंतर फरार झालेल्या बापाच्या पुणे पोलिसांनी संभाजीनगर येथून आज पहाटेच्या सुमारास मुसक्या आवळल्या आहेत तर मुंढवा येथील कोझी हाॅटेलचे  प्रल्हाद भुतडा.तर मॅनेजर सचिन अशोक काटकर व ब्लॅक पबचा मॅनेजर संदिप रमेश सांगळे.जयेश सतिश बोनकर.यांच्यावर अल्पवयीन मुलांला दारु पुरविल्या प्रकरणी बाल न्याय कायद्याचे कलम ७५ व ७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांनी सोमवारी दिली होती त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी आज या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान याबाबत बोलताना आयुक्त म्हणाले की आम्ही आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशी सर्वत्र चर्चा होत आहे.पण आम्ही या गुन्ह्यांत सर्व प्रकारची कलमे लावली आहेत.आम्ही याबाबत समोरा समोर चर्चा करण्यास तयार आहे.या गुन्ह्यात आम्ही कोणालाही सोडणार नाही.कायद्यापुढे सर्वजण समान आहेत.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्तांकडे देण्यात आला आहे.असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

  Previous articleपुण्यात दोघांना चिरडणारी पोर्शे कार आरटीओ नोंदणीविनाच पुण्यातील रोडवर धावत होती
  Next articleपुण्यातील कार अपघातामधील दोन्ही मृतांवर मुळगावी अंत्यसंस्कार

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here