Home Breaking News करवीर विधानसभेचे आमदार पी.एन.पाटील यांचे आज पहाटे निधन.काॅग्रेस पक्षाचा निष्ठावंत शिलेदार हरपला

करवीर विधानसभेचे आमदार पी.एन.पाटील यांचे आज पहाटे निधन.काॅग्रेस पक्षाचा निष्ठावंत शिलेदार हरपला

492
0

पुणे दिनांक २३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी.एन.पाटील यांचे आज पहाटे उपचारादरम्यान कोल्हापूर येथील अॅस्टर आधार हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे.दरम्यान वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गांधी परिवारातील विश्र्वासू तसेच महाराष्ट्रातील स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती ‌.

दरम्यान रविवारी दिनांक १९ मे रोजी आमदार पी.एन. पाटील हे सकाळच्या सुमारास घरातील बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यात त्यांच्या डोक्याला गंभीर रित्या दुखःपत झाली होती.यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.दरम्यान शस्त्रक्रिया नंतर त्यांची प्रकृती स्थिर होतीपण त्यांच्यावर प्रसिद्ध न्यूरो सर्जन हे उपचार करीत होते.पण आज पहाटेच्या सुमारास त्यांचे दुःखद निधन झाले आहे.

Previous articleहिट अँड रन प्रकरणी जामीन रद्द! अल्पवयीन आरोपीची रिमांड होम मध्ये रवानगी
Next articleसोलापूर येथील उजनी धरणात बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह सापडले.पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here