Home क्राईम गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणी एकूण १६ आरोपींच्या विरोधात दोन हजार पानांचे...

    गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणी एकूण १६ आरोपींच्या विरोधात दोन हजार पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल

    150
    0

    पुणे दिनांक २३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेने आज गुरुवारी दिनांक २३ मे रोजी विशेष न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांच्या न्यायालयात १६ आरोपींच्या विरोधात एकूण दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.या खूनातील मुख्य आरोपी व सुत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार यांच्यासह इतर सर्व आरोपी हे येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.गुंड शरद मोहोळ यांचा खून भरदिवसा पाच जानेवारी रोजी त्यांच्या घराजवळ कोथरूड येथील सुतारदरा येथे करण्यात आला होता.

    दरम्यान खून करून पळून गेलेल्या आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 पुणे ते सातारा रोडवरील शिरवळ जवळ त्यांच्या गाडीचा पाठलाग करुन एकूण आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्यावेळी आरोपींकडून तीन पिस्तूल व तीन मॅगझीन पाच काडतुसे व दोन मोटारी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. सदरचा खून हा जमीनीच्या व 💸 पैशांच्या वादातून करण्यात आला होता.यातील सर्व आरोपींच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी 👮 मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली होती.गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त अमोल झेंडे यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या पथकाने या गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हे शाखेच्या आरोपी विरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

    Previous articleअहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत SDRF पथकाची ⛵ बोट बुडून तीन जवानांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू
    Next articleडोंबिवली येथील एम‌आयडीसीतील स्फोटात चार जणांचा मृत्यू तर ३३ जण जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here