Home क्राईम अखेर पालकमंत्री अजित पवार प्रकटले! ‘कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असलातरी कारवाई करणार...

    अखेर पालकमंत्री अजित पवार प्रकटले! ‘कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असलातरी कारवाई करणार ‘

    136
    0

    पुणे दिनांक २४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणी दोषी असलेला अल्पवयीन दोषी आरोपी हा कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असलातरी कठोर कारवाई होणार.असा इशाराच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी अजित पवार यांनी आज पुण्यात प्रकट होऊन या घटनेची सर्व माहिती जाणून घेतली आहे.त्या नंतर ते माध्यमांनी बोलत होते.पुण्यातील या प्रकरणा वर माझे बारकाईने लक्ष आहे.माझा नेहमीच चुकीच्या कामाला सक्त विरोध असतो.असे देखील यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे.दरम्यान पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी मोठी घटना घडून देखील पालकमंत्री अजित पवार हे पुण्यात आले नव्हते त्यामुळे अनेक विरोधकांनी पालकमंत्री यांच्यावर टीका केली होती.

    दरम्यान आज अखेर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यात प्रकट झाले आहेत.यावेळी ते म्हणाले की पुण्याचा पालकमंत्री म्हणून पुण्यातील अपघातावर लक्ष ठेवून होतो.मला मिडीया समोर येणे आवडत नाही.असे स्पष्टीकरण देखील उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.या हिट अँड रन प्रकरणी कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही.या प्रकरणी माझ्या अधीन महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघात प्ररकणी संपूर्ण माहिती घेतली आहे.मी पोलिस आयुक्त यांच्या संपर्कात होतो .माझे काम सुरूच आहे.फक्त मी मिडिया समोर आलो नाही.असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.

    Previous articleडोंबिवली स्फोटाप्रकरणी फरार मालकीणीला नाशिक येथे अटक
    Next articleपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचं तातडीने निलंबन

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here