पुणे दिनांक २४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अभिनेत्री लैला खान व तिच्या कुटुंबातील पाच जणांचा खून दिनांक फेब्रुवारी २०२१ मध्ये इगतपुरी येथील फार्महाऊसवर करण्यात आला होता.खूना नंतर त्यांचे मृतदेह हे फार्महाऊसवरच एका खड्यात पुरण्यात आले होते.दरम्यान या खूनाचा तब्बल तेरा वर्षांनंतर मुंबईच्या सत्र न्यायालयाने लैलाच्या सावत्र बापाला या प्रकरणी आता फाशीची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान या प्रकरणात मे महिन्याच्या सुरुवातीलाच न्यायालयाने परवेझ टाक याला खून व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते.मागील सप्ताहात सरकारी वकील पकंज चव्हाण यांनी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याच्या कारणांने दोषी असलेल्या प्रवेझला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.हा नियोजित खून असल्याचे सरकारी वकील चव्हाण यांनी सांगितले आहे.