Home फायर गुजरात मधला गेमझोन कसला हा तर मृत्यूचा खेळ.३० जणांचा बळी यात १२...

गुजरात मधला गेमझोन कसला हा तर मृत्यूचा खेळ.३० जणांचा बळी यात १२ लहान मुलांचा समावेश

374
0

पुणे दिनांक २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार गुजरात मधील राजकोट येथील टीआरपी गेमझोनला भीषण आग लागली.या लागलेल्या भीषण आगीत ३० लोकांचा मृत्यू झाला आहे.यात १२ लहान मुलांचा समावेश आहे.रात्रीच्या सुमारास आग लागली. सदरची 🔥 आग ही अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आहे.या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर अथक प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

दरम्यान या आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी गुजरात राज्य सरकारच्या वतीने एस आय टीची पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.या आगीत सर्व ३० जणांचे मृतदेह हे होरपळले आहेत.तर काहींचे जळाले आहेत.त्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे.दरम्यान या आगीत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना गुजरात सरकारच्या वतीने प्रत्येकी चार लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.घटनास्ळी हजर असलेल्या प्रत्यक्ष स्थळी असलेल्या व या आगीतून वाचलेल्या एका व्यक्तीने माहिती दिली की.या गेमझोन मध्ये ल लहान मुले हे खेळण्यात दंग होते.त्यांचे पालक देखील त्यांच्या बाजूला ऊभे होते.पण अचानकपणे स्फोट झाला व काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले या आगीचे लोट एक किलोमीटर परिसरात दिसत होते.सदरची आग ही शाॅकसर्किटमुळे लागली.दरम्यान गेमझोनचा मालक 🔥 आग लागल्यानंतर फरार झाला आहे.या आगीची चौकशी साठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Previous articleपोर्शे कार अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबांच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या.अग्रवाल कुटुंबाचे पाय खोलात
Next articleहैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here