Home राजकीय ‘…तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा ‘ दमानिया.’सोडवण्यासाठी मी कोणालाही फोन...

  ‘…तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा ‘ दमानिया.’सोडवण्यासाठी मी कोणालाही फोन करत नाही ‘ अजित पवार

  66
  0

  पुणे दिनांक २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी नव नवीन घटना आता समोर येत आहे.पुणे अपघात प्रकरण दाबण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना फोन केला होता का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.दरम्यान कधीही गप्पा न राहणारे अजित पवार हे पुण्यातील अपघातानंतर चार दिवस गप्प कसे ? पुणे पोलिस आयुक्तांना अजित पवार यांनी फोन केला का ? यांचा खुलासा करावा.फोन केला असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा.अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

  दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की.’ मी कुणालाही ‘सोडवण्यासाठी फोन करत नाही ‘ पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही आरोप केले होते.अजित पवार यांनी पुण्याचे पोलिस आयुक्तांना फोन करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता का ? असा प्रश्न उपस्थित केला होता.दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.अपघाता मधील आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही .या अपघातामधील दोषींवर कारवाई होणारच.असे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

  Previous articleपुण्यातील ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी दोन डाॅक्टर व शिपाई यांना ३० मे पर्यंत कस्टडी
  Next articleमुंबईतील ताज हॉटेलसह अन्य ठिकाणी बाॅम्ब ठेवल्याचा फोन

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here