पुणे दिनांक २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ ची घटना घडली.या अपघातात दोन आयटी इंजिनियर यांचा या अपघातात मृत्यू झाला होता.सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला पण.पुणेकर नागरिकांच्या रेट्यामुळेच हे प्रकरणांने आता चांगलाच वेग घेतला आहे.या प्रकरणानंतर पुणे शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरून आज पुण्यातील एक्साईज कार्यालयात कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर व मोहन जोशी.उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी धडक देऊन उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले व पुण्यातील पब व बार यांच्याकडून अधिका-यांना दर महिन्याला ७० ते ८० लाख रुपये हाप्ता घेता .यांची यादीच वाचून दाखवली आहे.
दरम्यान यावेळी हे रवींद्र धंगेकर यांचे सर्व आरोप हे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी साफ चुकीचे आहे असे म्हटले आहे.तर यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी यांनी या अधिका-यांला यावेळी चांगलेच फैलावर घेतले व तुम्ही पाप करताय.माझ्या कडे या सर्व प्रकरणाची यादी आहे.तुमचे कोण कोण लोकं पैसे घेतात.तुम्ही स्वतःला काय शहाणे समजता का ? तुम्ही पुणे उध्वस्त केलं.तुम्हाला लाज कशी वाटत नाही? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले. तर यावर न थांबता आमदार रवींद्र धंगेकर यांनी चक्क उत्पादन शुल्क विभागातील हप्ते घेणा-या पोलिसांची नावेच या अधिका-यांच्या समोर वाचून दाखवली यात काॅन्सटेबल सुर्वे.पडवळ.बाळासाहेब राऊत.राहुल रामनाथ.सुप्रिटेंट चरणसिंह रजपूत.हे तुमच्या आशीर्वादाने हप्ते घेतात.पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही यांचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहे.असं सवालच आमदार रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांना सुनावले आहे.आम्ही आता शांतपणे तुम्हाला सांगायला आलो आहोत.यानंतर तुम्हाला शांतपणे सांगणार नाही.आमच्याकडे तुमच्या सर्व गोष्टींची माहिती आहे.असा कडक इशाराच यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.