Home क्राईम पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कच-यात फेकले

    पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कच-यात फेकले

    156
    0

    पुणे दिनांक २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात दिनांक १८ मे रोजी कल्याणीनगर येथील चौकात हिट अँड रनची घटना घडली होती.या अपघात मध्ये दोन आयटी इंजिनियर यांचा मृत्यू झाला होता. या अपघातामधील आरोपींने मद्यप्राशन करून पोर्शे कार भरघाव वेगाने चालवून अपघात केला म्हणून त्याला येरवडा 👮 पोलिसांनी अटक केली होती.त्याचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी त्याला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते.तिथे अल्पवयीन आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने कच-यात फेकण्यात आले होते.व त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात आल्या प्ररकणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून हॉस्पिटल मधील दोन डाॅक्टरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    दरम्यान आता हे हिट अँड रन प्रकरण दाबण्याचे प्रयत्न अल्पवयीन मुलांचे वडील तसेच आजोबा व अन्य लोकांनी त्यांना मदत केल्याचे आता ह्या सर्व गोष्टी हाळूहाळू बाहेर येत आहे.ससून रुग्णालयातील डॉक्टर यांना आरोपींच्या वडिलांनी फोन केला होता.हे आता उघड झाले आहे.तसेच पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 आरोपींच्या घरांचे व अल्पवयीन मुलगा १८ मे रोजी पोर्शे कार घेऊन कुठल्या हाॅटेल मध्ये व पबमध्ये गेला तसेच अपघात झालेल्या ठिकाणचे असे एकूण १५० सी सी टिव्ही फुटेज पोलिसांनी घेतले आहे.यात आता या गुन्ह्यातील अनेक पैलू पोलिसां कडे आहेत .ते आता बाहेर पडत आहे.पुणे अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पलची आदलाबदल करण्यात आली आहे.घटनेच्या दिवशी आरोपीला ससून रुग्णालयात पोलिसांनी 👮 नेण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल अधी पाठविण्यात आले होते.आरोपीच्या आधी दुसरे ब्लड सॅम्पल घेतले होते.आरोपीचे दुसरे ब्लड सॅम्पल हे वडिलांशी मॅच झाले.तसेच आता पोलिसांनी 👮 डिएन‌ए चाचणी साठी दुसरे ब्लड सॅम्पल घेतले होते.ससून रुग्णालयातील श्रीहरी हरनोळने ब्लड सॅम्पल बदलले या प्रकरणी ससूनच्या दोन डाॅक्टर यांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्या विरोधात आमच्याकडे भक्कम पुरावा असल्याचे पोलिस आयुक्त यांनी म्हटले आहे.

    दरम्यान याप्रकरणी पुण्यातील कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससून रुग्णालयांतील दोन डाॅक्टर यांना या अपघातामधील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे सॅम्पल अदलाबदली केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली या नंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की.अपघात झाला त्यादिवशी म्हणजे दिनांक १८ मे रोजी रात्री अनेकांनी आपले ईमान विकले.जे आता हळूहळू जगा समोर येत आहे.काही तासांत मिळणारे ब्लड रिपोर्ट जेव्हा सात दिवसांनंतरही मिळत नव्हते.तेव्हाच हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत होता.याच ससून रुग्णालयात मयत अश्र्विनी कोस्टाचा मृतदेह अॅब्युलन्स येईपर्यंत अर्धा तास शवगृहात ठेवण्यास ससून रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीने नकार दिला होता.असेही यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

    Previous articleपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपींच्या बल्ड रिपोर्ट मध्ये फेरफार! ससूनच्या दोन डाॅक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
    Next articleधंगेकर व अंधारे यांनी एक्साईज कार्यालयात अधिका-यांची काढली लाज . पुण्यात एक्साईजला मिळतो ८० लाख रुपयांची लाच यादीच वाचून दाखवली

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here