Home क्राईम पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपींच्या बल्ड रिपोर्ट मध्ये फेरफार! ससूनच्या...

  पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपींच्या बल्ड रिपोर्ट मध्ये फेरफार! ससूनच्या दोन डाॅक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

  421
  0

  पुणे दिनांक २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणांतील अल्पवयीन आरोपींच्या बल्ड रिपोर्ट मध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 दोन ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर कारवाई केली आहे.यात डॉक्टर अजय तावरे व डॉक्टर श्रीहरी हरलोर.यांना अटक करण्यात आले आहे.

  दरम्यान हा अपघात झाल्यापासून अपघात प्रकणात अल्पवयीन आरोपीचा बल्ड रिपोर्ट सुरुवातीपासूनच चर्चेत आला होता.तसेच ब्लड रिपोर्ट देण्यासाठी देखील कालावधी भरपूर लावला होता.या बोल्ड रिपोर्ट संदर्भात पुण्यातील सर्वच माध्यमांनी पोलिस आयुक्त सह तपासी अधिकारी यांना देखील विचारणा केली होती.अल्पवयीन आरोपींने मद्य प्राशन केले होते की नाही.हे ब्लड रिपोर्ट मधूनच स्पष्ट होणार आहे.त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट म्हत्वाचा आहे.आणी त्या करीता हे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनेच अल्पवयीन आरोपींच्या बल्ड रिपोर्ट मध्ये फेरफार करण्यात आली आहे.व यांचा तपास करत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.अशी माहिती आता समोर येत आहे.

  Previous articleमालेगावात मध्यरात्रीच्या वेळी माजी महापौरांवर अज्ञात व्यक्तीनी झडल्या तीन गोळ्या
  Next articleपुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कच-यात फेकले

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here