Home Breaking News मालेगावात मध्यरात्रीच्या वेळी माजी महापौरांवर अज्ञात व्यक्तीनी झडल्या तीन गोळ्या

मालेगावात मध्यरात्रीच्या वेळी माजी महापौरांवर अज्ञात व्यक्तीनी झडल्या तीन गोळ्या

449
0

पुणे दिनांक २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार नाशिक येथील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना घडली असून.रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला आहे.बाईकवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माजी महापौर व एम‌आय‌एमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार केला आहे.यात मलिक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अब्दुल मलिक हे  मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एका हाॅटेल मध्ये चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी बाईक वरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तीने अचानकपणे मलिक यांच्यावर गोळीबार केला.या गोळीबारात त्यांच्या हाताला व पायाला तसेच बरगडीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी 👮 गोळीबार करून फरार झालेल्या हल्लेखोरांच्या शोधा साठी वेगवेगळी पथके तातडीने रवाना केली आहेत.दरम्यान अचानकपणे झालेल्या गोळीबारामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.

Previous article१० वर्षांनंतर आयपीएल फायनल कोलकाताने ट्राॅफी जिंकली
Next articleपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपींच्या बल्ड रिपोर्ट मध्ये फेरफार! ससूनच्या दोन डाॅक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here