पुणे दिनांक २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मोठी अपडेट हाती आली असून मध्य पश्चिम रेल्वे गुजरात वरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे डब्बे रेल्वे रुळावरून पालघर येथे घसरले आहेत.या मालगाडीत असणारे लोखंडी रोल रेल्वे रुळावरच पडले आहेत.याचा परिणाम हा लोकल व लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसवर झाला आहे.यात मालगाडीचे ५ ते ६ डब्बे घसरले आहेत.दरम्यान सदरचा अपघात झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी हे घटना स्थळी दाखल झाले असून सध्या रेल्वे रूळावर घसरलेले डब्बे रेल्वेक्रेनच्या सहाय्याने उचलण्याचे काम सुरू झाले आहे.अशी माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.