Home क्राईम पुण्यात चंदननगर सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून ट्रकने काॅलेजच्या विद्यार्थ्यांना चिरडले दोघांचा...

  पुण्यात चंदननगर सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून ट्रकने काॅलेजच्या विद्यार्थ्यांना चिरडले दोघांचा मृत्यू.एकजण जखमी

  192
  0

  पुणे दिनांक २८ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते नगर रोडवर चंदननगर रोडवर सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिराडले .या अपघातात दोन काॅलेजच्या युवकांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.सदरची घटना ही रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.यात एक जण जखमी झाला आहे.हे विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील असून ते शिक्षणासाठी पुण्यात आले होते.ते वाघोली परिसरात राहत होते.

  दरम्यान सदर घटनेची माहिती पोलिस सूत्रांनी दिली की मालवाहतूक करणारा ट्रक वाघोलीच्या दिशेने पुण्याकडे येत होता.अपघाता नंतर ट्रक चालक श्याम बांबू गौतम याला ताब्यात घेतले आहे.ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकी वरील तीन जणांना फरफटत नेले यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.तर एकजण जखमी झाला आहे.या अपघात प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

  Previous articleदिल्लीत इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बाॅम्बच्या धमकीने एकच खळबळ.प्रवाशांच्या जीव वाचवण्यासाठी विमानातून उड्या!
  Next articleगुजरातवरुन मुंबईकडे येणारी मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here