Home Breaking News ‘ हिट अँड रन ‘ अपघात प्रकरण.ससून हाॅस्पीटलमध्ये चौकशी समितीने डिनच्या कार्यालयातच...

‘ हिट अँड रन ‘ अपघात प्रकरण.ससून हाॅस्पीटलमध्ये चौकशी समितीने डिनच्या कार्यालयातच बिर्याणीवर मारला ताव

184
0

पुणे दिनांक २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणांतील अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून हॉस्पिटलमधील दोन डाॅक्टर व एक शिपाई यांच्या मुसक्या पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत.दरम्यान या प्रकरणी आज ससून हॉस्पिटलमध्ये चौकशी समितीने पुण्यातील प्रसिद्ध अशा ब्ल्यू नाईल बिर्याणीवर वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांच्या केबिनमध्ये ताव मारला आहे.वैद्यकिय अधिष्ठाता डॉ . काळे यांच्या केबिनमध्ये बिर्याणीच्या मोकळ्या बॅगा  आढळून आल्या आहेत ‌.आता या चौकशी समितीची बिर्याणी मेजवानीची चर्चा पुणे शहरात सर्वत्र सुरू आहे.

दरम्यान या चौकशी समितीत डॉ.पल्लवी सापळे.व  डॉ.सुधीर चौधरी. डॉ.गजानन चव्हाण.यांचा यात समावेश आहे.हे तिघेजण आज पुण्यात चौकशी साठी आले होते.आज त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये जवळ जवळ आठ तास चौकशी केली त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Previous articleगुजरातवरुन मुंबईकडे येणारी मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले
Next articleपुणे ‘ हिट अँड रन ‘ पोर्शे कारचा वेग ताशी १६० चा दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. ‘ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ‘ च्या मदतीने जिवंत करणार अपघाताची घटना पुणे गुन्हे शाखेचे पोलिस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here