पुणे दिनांक २९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने आज मोठा झटका दिला आहे.अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनाला सात दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना दिनांक २ जूनला आत्मसमर्पण करावेच लागणार आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय तपासणीचा हवाला देत अंतरिम जामीन सात दिवसांसाठी वाढवण्याची याचिका दाखल केली होती.