Home क्राईम पुणे ‘ हिट अँड रन ‘ पोर्शे कारचा वेग ताशी १६० चा...

    पुणे ‘ हिट अँड रन ‘ पोर्शे कारचा वेग ताशी १६० चा दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. ‘ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ‘ च्या मदतीने जिवंत करणार अपघाताची घटना पुणे गुन्हे शाखेचे पोलिस

    68
    0

    पुणे दिनांक २९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ अपघातामधील दोषींवर कडक शिक्षा व्हावी म्हणून पुणे गुन्हे शाखेच्या पोलिस हे चांगलेच अॅक्शन मोड वर आले आहेत.तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र एक केला आहे.त्याच दुष्टीने आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स ‘ च्या सहकार्यांने.     (AI) प्रत्यक्ष घटनास्थळाचा अपघाताचा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या करिता एआय मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतूक व्यवस्थेशी संबंधित केंद्रीय संस्थेची मदत देखील घेतली जाणार आहे.

    दरम्यान दिनांक १८ मे शनिवार पुण्यातील कल्याणी नगर येथे मध्यरात्री २.३० च्या सुमारास भरघाव १६० च्या वेगाने पोर्शे कारने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील दोघां आयटी इंजिनियर‌ युवक व युवतीचा मृत्यू झाला होता.दरम्यान ‘ प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ( आरटीओ) च्या अधिका-यांनी केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार ही कार ताशी १६० घ्या किलोमीटर भरघाव वेगाने धावत होती.असे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तेथील सी सी टिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही पोर्शे कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानंतर रोडवरील असलेल्या अन्य वाहनांना धडक दिली.त्यामुळे या कारचा अपघाताच्या वेळी कारचा वेग हा किती असेल.याचा अभ्यास आता केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.कारच्या मागील कॅमेरा 📷 मध्ये अपघाताच्या ठिकाणी चित्रित झालेली दुश्ये मिळवण्यात पोर्शे कारच्या तज्ज्ञ व आरटीओचे अधिकारी यांची देखील मदत पुणे पोलिस घेत आहेत.व ही संपूर्ण माहिती गोळा करून त्याच आधारे ‘ ए‌आय’ च्या मदतीने अपघाताचे दुश्ये बनविण्याचा प्रयत्न या अपघाताचा तपास करणारी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान अपघात प्रकरणी सबळ पुरावे गोळा करण्यासाठी अपघाताच्या घटनेचे एकंदरीत ‘डिजिटल रिक्रिएशन ‘ करण्यात येणार आहे.

    Previous article‘ हिट अँड रन ‘ अपघात प्रकरण.ससून हाॅस्पीटलमध्ये चौकशी समितीने डिनच्या कार्यालयातच बिर्याणीवर मारला ताव
    Next articleधारावीत आज पहाटे गारमेंटच्या कारखान्याला आग लागून सहा कामगार जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here