Home राजकीय पुणे हिट अँड रन प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन डॉ.विनायक काळे सक्तीच्या रजेवर...

  पुणे हिट अँड रन प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन डॉ.विनायक काळे सक्तीच्या रजेवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कारवाई

  77
  0

  पुणे दिनांक २९ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणांतील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार केल्याच्या आता राज्यसरकारच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे.ससून रुग्णालयाचे डॉ.अजय तावरे व डॉ.श्रीहरी हळनोर व शिपाई अतुल घटकांबळे यांना आज निलंबित करण्यात आले आहे.तर ससून रुग्णालयाचे डीन डॉ.विनायक काळे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

  दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना मुश्रीफ यांनी म्हणाले की.ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाच्या चौकशी करीता जे.जे.रुग्णालयाच्या डीन डॉ.पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची टीम नेमण्यात आली होती.या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉ.अजय तावरे व डॉ.श्रीहरी हळनोर यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.तर ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.तसेच शिपाई अतुल घटकांबळे यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की या प्रकरणी आम्ही सक्त कारवाई करु.ब्लड सॅम्पल बदलणे ही अतिशय गंभीर अशी बाब आहे.यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय रुग्णालयात अशा घटना घडू नये म्हणून त्यांना अशी कडक शिक्षा देऊ की पुढे असे प्रकरण त्यांना करता येणार नाही.अशी कारवाई करण्याचे आम्ही ठरविले होते.आमच्या समितीच्या वतीने योग्य असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही कारवाई केली आहे.त्यांना योग्य असा धडा शिकविल्या शिवाय आम्ही गप्प राहणार नाही.असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी खडसावून सांगितले.तसेच या प्रकरणी कारवाई करण्यात उशिर झाल्या बद्दल त्यांनी सांगितले की.मी  काही दिवस प्रदेशात होतो मी २५ तारखेला आलो.दिनांक २६ ला घटना समजली मी तातडीने त्यामध्ये लक्ष घातले.असे ते म्हणाले आहेत.

  Previous articleपुण्यातील ‘ हिट अँड रन ‘ ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार करणा-या दोन डाॅक्टर व शिपाई निलंबित.वैद्यकिय शिक्षण विभागाची मोठी कारवाई
  Next articleपुणे ‘ हिट अँड रन ‘ बदलेले रक्ताचे नमुने वेदांच्या आईचे ? पोलिस घेतात शोध

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here