पुणे दिनांक ३० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मूतील अखनूर येथे भाविकांची बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला असून यात आता मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.१६ वरुन २१ अशी झाली आहे.तर २५ पेक्षा जास्त भावीक हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान या बस अपघातातील मृतांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.या दुर्घटना नंतर मी व्यथित झालो असून ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत.त्यांच्या सोबत आमचे विचार आहेत. या दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.तसेच मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान सहाय्याता निधीतून २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये मदत देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.