Home क्राईम पुणे ‘ हिट अँड रन ‘ बदलेले रक्ताचे नमुने वेदांच्या आईचे ?...

  पुणे ‘ हिट अँड रन ‘ बदलेले रक्ताचे नमुने वेदांच्या आईचे ? पोलिस घेतात शोध

  315
  0

  पुणे दिनांक ३० मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कारच्या हिट अँड रन मधील प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालचे ससून रुग्णालयात बदलेले रक्ताचे नमुने हे महिलेचे असल्याची माहिती पुढे आली आहे.पण हे रक्ताचे सॅम्पल अल्पवयीन आरोपी वेदांतच्या आईचे असल्याची चर्चा आहे.दरम्यान रविवारी ससून रुग्णालयात वेदांतचे रक्ताचे नमुने घेताना त्याच्या सोबत त्याची आई देखील ससून रुग्णालयात उपस्थित असल्याची माहिती आहे.दरम्यान या हिट अँड रन प्रकरणी वेदांत अग्रवाल यांच्यासह वडील विशाल अग्रवाल व आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या नंतर आता त्याच्या आईला देखील पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.तसेच पोलिस हे वडगावशेरी येथील अग्रवाल यांच्या निवासस्थानी जबाब घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.पण वेदांतची आई ही घरी अढाळून आली नाही.त्यामुळे पोलिस तिचा शोध घेत आहेत.

  Previous articleपुणे हिट अँड रन प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन डॉ.विनायक काळे सक्तीच्या रजेवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कारवाई
  Next articleसांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरुन आलेल्या दोन जणांनी गोळी झाडून केली एकाची हत्या

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here