Home क्राईम विक्रोळीत म्हाडाच्या जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून दोन रहिवाशांचा दुर्दैवी मृत्यू

    विक्रोळीत म्हाडाच्या जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून दोन रहिवाशांचा दुर्दैवी मृत्यू

    267
    0

    पुणे दिनांक ३० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील विक्रोळी येथे म्हाडाची ६० वर्षा पूर्वीची इमारतीचा स्लॅब आज गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानकपणे कोसळून यात दोन रहिवाशांचा मृत्यू झाला आहे.ही इमारत क्रमांक ४० असल्याचे समजते.यात मृत्यू झालेल्या दोन जणांची नावे.१) सुर्यकांत म्हादलकर २) शरद म्हसाळ अशी नावे आहेत.त्यांना उपचारासाठी विक्रोळीतील बेडेकर  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

    दरम्यान या दुर्घटना नंतर या इमारतीत राहणाऱ्या लोकांना तातडीने इमारतीच्या बाहेर काढण्यात आले आहे.सदरची इमारत ही ६० वर्षांची जुनी म्हाडाची इमारत आहे.तर दुर्घटना घडल्यानंतर आता या ठिकाणी बॅरीकेंटीग केले आहे.तर घटनास्थळी उध्दव ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी भेट दिली आहे.व या घटनेला म्हाडाचे अधिकारी यांना दोषी ठरवून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राऊत यांनी यावेळी केली आहे.

    Previous articleजम्मूतील बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वरुन २१ झाला.केंद्र सरकार कडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
    Next articleफेक बनावट पदवी प्रमाणपत्र तरीही बॅंकेत नोकरी.चतु:श्रृगी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here