पुणे ३० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पिंपरी चिंचवड येथील सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास दुकानाजवळ थांबलेल्या दीपक कदम या तरुणांवर बाईक वरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करून त्याची हत्या केली आहे. सदर गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले आहेत.दरम्यान या गोळीबारात जखमी झालेल्या दीपकला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर सांगवी येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या गोळीबारा नंतर पोलिसांनी अज्ञात दोन हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 👮 आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके तयार केली असून ते या आरोपींचा शोध घेत आहेत.