पुणे दिनांक ३१ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात एक तळघर आढळून आले आहे.सदरचे तळघर आढळून आल्या नंतर आश्र्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.दरम्यान सदरचे तळघर हे साधारण ७ ते ८ फूट खोल असल्या बाबत माहिती मिळत आहे.या तळघरात काही प्राचीन काळातील मुर्ती आढळून आल्या आहेत.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कान्होपात्रा मंदीराजवळ सदरचे तळघर आढळून आले आहे.आज येथे पुरातत्व विभागाचे अधिकारी या मंदिरात दाखल झाले होते.या तळघरात असलेली संपूर्ण माती बाहेर काढली जात आहे.या तळघरात सापडलेल्या मातीचे देखील परिक्षण केले जाणार आहे.या तळघरात सापडलेल्या वस्तूंची तपासणी करून त्याचा संपूर्ण अहवाल हा राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.