Home क्राईम फेक बनावट पदवी प्रमाणपत्र तरीही बॅंकेत नोकरी.चतु:श्रृगी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

  फेक बनावट पदवी प्रमाणपत्र तरीही बॅंकेत नोकरी.चतु:श्रृगी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

  207
  0

  पुणे दिनांक ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.पुण्यातील एका युवकाने फेक बोगस पदवी प्रमाणपत्रावर चक्क बॅंकेत नोकरी मिळवली होती.पण त्याची आता पोलखोल झाली आहे.त्यामुळे पुण्यातील शिक्षणाच्या माहेरघरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान फेक बनावट प्रमाणपत्र मिळवून बॅंकेत नोकरी मिळवणां-या युवकाचे नाव वैभव जाधव असे नाव आहे.याने पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका काॅलेज मधून शिक्षण घेतले.व बीकॉम उत्तीर्ण होत त्यांने पदवी मिळवली होती.परंतू त्यांची ही पदवी बोगस असल्याचे आता उघडकीस आले.व धक्कादायक बाब म्हणजे याने चक्क या फेक बनावट प्रमाणपत्राद्वारे चक्क तीन वर्षे ठाण्यातील एका बॅंकेत नोकरीवर कार्यरत होता. आता त्याची सर्व पोलखोल झाली असून आता त्याच्या विरोधात पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Previous articleविक्रोळीत म्हाडाच्या जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून दोन रहिवाशांचा दुर्दैवी मृत्यू
  Next articleपंढरपुरातील मंदीराच्या तळघरात सापडल्या प्राचीन मुर्ती

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here