पुणे दिनांक ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई ते गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.या अपघातात रिक्षा व टेम्पो यांची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर दोन जण हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.यात जखमींची प्रकृती ही चिंताजनक आहे.
दरम्यान मुंबई ते गोवा महामार्गावरील माणगाव येथे सदर अपघात झाला असून अपघातग्रस्त रिक्षा ही माणगाव येथून इंदापूरच्या दिशेने जात होती.तर आयशर टेम्पो हा मुंबई वरून माणगावाकडे जात होता.माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत रिक्षा व टेम्पो यांची समोरा समोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षातील तीन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.यात रिक्षाचा चक्काचुर झाला आहे.जखमींना तातडीने माणगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून दोन जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मयत १) नंदा पवार ( वय ३५ ) २) शेवंती कोळी ( वय ४० ) ३) संगिता वाघमारे ( वय २०) यांचे मृतदेह हे पोस्टमार्टम करीता शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत.