पुणे दिनांक १ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली यावेळी इंडिया आघाडी देशात २९५ पेक्षा जास्त जागा जिंकेल.असा विश्र्वास काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.आज शेवटच्या आणि टप्प्यातील लोकसभा मतदानादरम्यान आज दिल्लीत इंडिया आघाडीची म्हत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्या संदर्भात ही बैठक बोलवण्यात आली होती.सदरची बैठक संपल्यानंतर यावेळी पत्रकार परिषदेत खरगे असं म्हणाले आहेत.
दरम्यान आजच्या या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे. सोनिया गांधी.राहुल गांधी.के.सी.वेणुगोपाल . समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव.तसेच शरदचंद्र पवार.जिंतेद्र आव्हाड.आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान.खासदार संजय सिंह.राघव चढ्ढा.द्रमुकचे टी.आर. बालू.आरजेडीच्या वतीने तेजस्वी यादव.जेएमएमच्या वतीने चंपाई सोरेन व कल्पना सोरेन.नॅशनल काॅन्फरन्सच्या वतीने.फारुख अब्दुल्ला.सीपीआयच्या वतीने डी .राजा.सीपीआय ( एम) कडून सीताराम येचुरी.व शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या वतीने अनिल देसाई उपस्थित होते.