Home राजकीय एक्झिट पोल नुसार बारामतीत सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

  एक्झिट पोल नुसार बारामतीत सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

  189
  0

  पुणे दिनांक १ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील सातव्या टप्प्यातील मतदान आज सायंकाळी संपल्यानंतर आता लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालांकडे  सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.यात प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीकडे सात समुद्रापार प्रर्यत लक्ष लागले होते.आज बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान टीव्ही ९ पोलस्ट्राट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  दरम्यान यावेळी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघाबाबत बोलायचे झाल्यास.या टिव्ही ९ च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एकूण ४८ जागांपैकी भाजपला फक्त १८ जागा तर शिवसेना ४ जागा म्हणजे महायुती लाख एकूण २२ जागा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.तर महाविकास आघाडीला २५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.यात विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एकही जागा दाखवण्यात आली नाही.याचाच अर्थ बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार असून येथे पून्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेच खासदार होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आले आहे.

  Previous articleअल्पवयीन मुलांच्या आईनेच रक्त दिल्याचे क्राईम ब्रँचच्या पोलिसांकडे दिली धक्कादायक कबुली
  Next articleपंजाबमध्ये दोन मालगाड्या आज पहाटे एकामेकांवर आदळून अपघात दोन चालक गंभीर रित्या जखमी प्रकृती चिंताजनक

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here