Home क्राईम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा दिलासा नाही

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा दिलासा नाही

    164
    0

    पुणे दिनांक १ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय दिल्लीच्या न्यायालयाने राखून ठेवला आहे.दरम्यान न्यायालयाने या निर्णयासाठी ५ जूनची तारीख निश्चित केलेली आहे ‌त्यामुळे आज अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही.आता केजरीवाल यांना उद्या तिहार तुरुंगात जावे लागणार आहे.दरम्यान यापूर्वी अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीकरीता प्रचार करण्यासाठी कोर्टाने २१ दिवसांकरीता जामीन दिला होता.नंतर वैद्यकीय कारणास्तव ७ दिवस जामीन मिळावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.पण तिथे त्यांना जामीन मिळाला नाही.त्या नंतर त्यांनी आज दिल्लीतील  एव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल केली होती.पण त्यांना आज दिलासा मिळाला नाही.उद्या केजरीवाल यांना दिल्लीतील तिहार तुरुंगात जावे लागणार आहे.

    Previous articleपुण्यातील ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी ‘ आई व मुलाची समोरासमोर चौकशी ‘
    Next articleइंडिया आघाडी २९५ जागा जिंकेल.सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्र्वास

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here