पुणे दिनांक १ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कर्वे रोड येथील नळ स्टॉप चौकात एक भीषण अपघात झाला आहे.आज सकाळी एक सायकल स्वार हा अचानकपणे क्रेनच्या खाली आल्याने क्रेनच्या चालकाने त्याला चिरडले आहे.यात सायकल स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.हा सायकल स्वार हा नळ स्टॉप चौकातून डेक्कनकडे चालला होता.सदर अपघाताची घटना ही सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून.या अपघात प्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये क्रेनच्या चालका विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.या अपघात प्रकरणी पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.