पुणे दिनांक १ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल व त्यांची आई शिवानी अग्रवाल यांना पुणे क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी आज सकाळी अटक केल्यानंतर त्यांची बाल निरीक्षण गृहामध्ये मुलगा व आई यांची तब्बल एक तास समोरासमोर चौकशी केली आहे .यावेळी अल्पवयीन मुलाने क्राईम ब्रँचच्या पोलिसांच्या एकाही शब्दांचे उत्तर दिले नाही.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.अपघाता नंतर ससून रुग्णालयात वेदांत अग्रवाल याच्या ब्लड सॅम्पलऐवजी शिवानी अग्रवाल यांनी ब्लड सॅम्पल दिले असा पोलिसांना संशय आहे. पोलिस आज शिवानी अग्रवाल यांना ससून रुग्णालयात नेवून त्यांचे ब्लड सॅम्पल हे तपास करीता घेणार आहे.अशी माहिती मिळत आहे.