Home Breaking News पंजाबमध्ये दोन मालगाड्या आज पहाटे एकामेकांवर आदळून अपघात दोन चालक गंभीर रित्या...

पंजाबमध्ये दोन मालगाड्या आज पहाटे एकामेकांवर आदळून अपघात दोन चालक गंभीर रित्या जखमी प्रकृती चिंताजनक

224
0

पुणे दिनांक २ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार पंजाब येथील फतेहगढ साहिबमधील सरहिंदमधील माधोपूरजवळ आज रविवारी पहाटे मोठी दुर्घटना टळली आहे.रेल्वेच्या दोन मालगाड्या ह्या एकमेकांवर आदळल्या आहेत.या अपघातात दोन रेल्वेचे चालक  गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांना साहिब  सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पाटियाला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या अपघाताबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात दोन मालगाड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याची स्थिती पाहता ही दोन मालगाड्याची टक्कर एवढी भीषण होती.याचा अंदाज येऊ शकतो.यातील दोन्ही मालगाडीचे चालक गंभीर रित्या जखमी झाले आहेत.आता त्यांच्यावर पाटियाला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous articleएक्झिट पोल नुसार बारामतीत सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?
Next articleहडपसर येथील भेकराईनगर येथे वाहनांची व दुकानांची तोडफोड करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनीही आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here