Home फायर दिल्लीत धावत्या ताज एक्स्प्रेसला भीषण आग.आगीत दोन डब्बे जळून खाक कोणत्याही प्रकारची...

दिल्लीत धावत्या ताज एक्स्प्रेसला भीषण आग.आगीत दोन डब्बे जळून खाक कोणत्याही प्रकारची जीवीतहानी नाही

288
0

पुणे दिनांक ३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीत धावत्या ताज एक्स्प्रेस क्रमांक १२२८० च्या दोन डब्ब्यांना तुघलकाबाद-ओखला दरम्यान भीषण 🔥 आग लागली.आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.दरम्यान या आगीत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.असे रेल्वेच्या डीसीपी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

दरम्यान याप्रकरणी दिल्लीच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत धावत्या ताज एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.सध्या ही ट्रेन थांबवण्यात आली आहे.दरम्यान डब्ब्यांन आग लागल्यानंतर प्रवासी हे तातडीने दुसऱ्या डब्यात गेले होते.त्यामुळे कोणीही या आगीत जखमी झाले नाहीत.या आगीत दोन डब्बे जळून मात्र खाक झाले आहेत.या आगीत बाबत रेल्वे कडून पुढील कारवाई सुरू आहे.

Previous articleकोल्हापुरातील सायबर चौकात भरघाव कारने सहा जणांना चिरडले.कार चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू
Next articleमान्सून ४ ते ५ दिवसांमध्ये दक्षिण महाराष्ट्रात.मुंब‌ई व अलिबागमध्ये पावसाला सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here