Home Breaking News भाविकांच्या लक्झरी बसवर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला,१० भाविकांचा मृत्यू

भाविकांच्या लक्झरी बसवर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला,१० भाविकांचा मृत्यू

639
0

पुणे दिनांक ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार जम्मू काश्मीर येथील रियासी जिल्ह्यात आज रविवारी  भाविकांच्या लक्झरी बसवर दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला.दरम्यान या गोळीबार नंतर ही बस एक खोल दरीत कोसळली असून या अचानकपणे झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात बसमधील दहा भाविकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार वैष्णवीदेवी येथून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवखोरी हे धार्मिक स्थळ आहे.येथे शिव मंदिर असून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.बस मधील भाविक हे दर्शन घेऊन परतत असताना व ही बस कटराच्या दिशेने येत असताना रियासी जिल्ह्यातील चंडी येथे वळणावर दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी या बसवर अंदाधुंद गोळीबार केला.या गोळीबारात बसच्या चालकाला गोळी लागल्याने बस चालक जखमी झाला व बसवरील नियंत्रण सुटल्याने बस एक मोठ्या दरीत कोसळली व यात दहा भाविकांचा मृत्यू झाला आहे.सदर घटनेनंतर  तातडीने सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या भागात सर्वत्र नाकाबंदी केली आहे.व दहशतवादी यांचा शोध सुरू आहे.तर दुर्घटनाग्रस्त बस मधील भाविकांच्या मदतीसाठी मदतकार्य सुरू असून त्यांना दरीतून बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे.

Previous articleमै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूॅं… नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ
Next articleभारतने पाकिस्तानचा न्यूयॉर्क मध्ये उडवला धुव्वा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here