पुणे दिनांक १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.या निवडणुकीत आता महायुती आमनेसामने आली आहे.मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजप.शिवसेना . राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होतांना दिसत आहे.आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्या मुळे आज या घडामोडीकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान आज अर्ज मागे घेतला नाही तर या पदवीधर निवडणूकीत महायुतीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या महायुतीत आता बिघाडी झाल्याचं एकंदरीत दिसत आहे.दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती मधील घटक पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.आज या शिक्षक पदवीधर विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.दरम्यान विधान परिषदेची निवडणूक दिनांक २६ जून रोजी होत आहे.ही सदरची निवडणूक एकूण चार जागांसाठी आहे.यात महायुती मधून भारतीय जनता पार्टी व शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत.आज अर्ज मागे घेण्याची शेवटीची तारीख आहे.आता महायुतीचे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार की सामंजस्याने उमेदवार मागे घेणार हे आज स्पष्ट होणार आहे.