पुणे दिनांक १३ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नागपूर येथील धामणा येथील चांमुडा बारुद कंपनीत आज गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाला आहे.अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे.कंपनी मध्ये आज कामगार काम करीत असताना अचानक पणे हा भीषण स्फोट झाला आहे.या स्फोटात सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे मृतात पाच महिला व एक पुरुषाचा समावेश आहे .तर अन्य कामगार हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत.दरम्यान चांमुडा या कंपनीत स्फोटकं बनविले जात होते.दरम्यान या कंपनीत झालेला स्फोट एवढा भीषण होता की मृतांचे अवशेष हे कंपनीच्या बाहेर पडले होते.
दरम्यान या स्फोटात अनेक कामगार हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या स्फोटाची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.व ते आगीवर नियंत्रण मिळवण्या साठी प्रयत्न करत आहे.या आगीची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.