पुणे दिनांक १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील १९ मे रोजी झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना आता यात एक नवीन अपडेट समोर आली आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे की.अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी या अपघातात मृत्यू झालेल्या दोन आयटी इंजिनियर यांचा व्हिसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पाॅझिटीव्ह यावा .या करीता पुर्णपणे तयारी झाली आहे.असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.त्यामुळे आता या पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताला एक नवीन वळण लागले असून देशमुख यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.