पुणे दिनांक १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सुनेत्रा पवार यांना आज राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली अशी माहिती समोर आली आहे.काल रात्री उशिरा झालेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मिळत आहे.
दरम्यान आज राज्यसभेसाठी फाॅर्म भरण्याची शेवटची तारीख असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या समवेत सुनित्रा पवार या फाॅर्म दाखल करतील . दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर ही राज्यसभेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा रिक्त झाली होती.या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबळ.पार्थ पवार.बाबा सिद्दीकी व आनंद परांजपे इत्यादीजण इच्छूक होते.सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी.या करीता बारामती व पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वांकडे केली होती.आता पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन महिला खासदार या संसदेत असणार आहे.