पुणे दिनांक १६ जून ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून त्या नंतर विदर्भात दाखल झाल्या नंतर काही ठिकाणी पाऊस झाला तर काही ठिकाणी पाऊस झाला नाही. दरम्यान मागील दोन दिवसांपासून पाऊस झाला नाही. व पाऊसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतिक्षात आहे. दरम्यान अरबी समुद्रातील वा-यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आता मान्सूनचा प्रवास हा संथगतीने सुरू आहे. २० जून नंतर मान्सून पुर्णपणे महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. व मुसळधार पाऊस पडेल. असा हवामान विभागाच्या वतीने अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात आज रविवारी दिनांक १६ जून रोजी तुरळक व वादळी वाऱ्यासह पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान आज मुंबई व पुण्यासह ठाणे. रायगड. व रत्नागिरी. सिंधुदुर्ग. या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. याच बरोबर. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर. सांगली. सातारा. कोल्हापूर. या भागात मेघगर्जना⚡ व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. असा हवामान खात्याच्या वतीने अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान पाऊसा बरोबर वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे. तर हे वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असू शकतात. असं आय एमडीच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान येणाऱ्या २४ तासात धुळे. नंदुरबार. जळगाव. नाशिक. अहमदनगर. पुणे. व कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊसाचा जोर वाढणार आहे. असे हवामान विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.