Home Breaking News नागपूरात भीषण अपघात ट्रॅव्हल्स बसने रिक्षाला चिरडल्याने दोन जवानांचा मृत्यू अन्य सहा...

नागपूरात भीषण अपघात ट्रॅव्हल्स बसने रिक्षाला चिरडल्याने दोन जवानांचा मृत्यू अन्य सहा जवान जखमी

566
0

पुणे दिनांक १७ जून ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नागपूर-कामठी महामार्गावर भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने ऑटो रिक्षाला जोरात धडक दिल्याने रिक्षा हवेत उडून चिरडल्याने झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य ६ ते ७ जवान गंभीर रित्या जखमी झाले असून त्यातील तीन जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या अपघाता बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नागपूर-कामठी महामार्गावर ट्रॅव्हल्स व ऑटो रिक्षा यांच्यात भीषण असा अपघात झाला. यावेळी रिक्षा मधून प्रवास करणारे जवान कामठी येथील सैन्याच्या डेपो ( कॅन्टोन्मेंट) येथे जात होते. या अपघातात एक जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या जवानांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान या अपघात बाबत पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स 🚍बस ही भरघाव वेगाने येत होती. तिने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाला चिरडले त्यामुळे रिक्षा मधील दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य ६ ते ७ जवानांना उपचारा करीता मेयो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तीन जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान महामार्गावर अपघात झाल्यानंतर बसचा ड्रायव्हर हा पळून गेला आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्स बसच्या काचा फोडल्या व महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. हा अपघात रविवार पाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

Previous articleपुणे क्राइम ब्रॅचच्या पोलिसांनी पुण्यातील न-हे येथील कारखान्यांवर छापेमारी करून १कोटी ३९ लाखाचा गुटखा जप्त
Next articleपुण्यातील ६० ते ७० हाॅस्पीटल बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी; ई-मेल मिळताच पुण्यात एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here