Home Breaking News पुण्यातील गोल्फ चौकात भरघाव वेगाने आलेल्या मर्सिडिज कारने दुचाकी स्वारला चिरडले

पुण्यातील गोल्फ चौकात भरघाव वेगाने आलेल्या मर्सिडिज कारने दुचाकी स्वारला चिरडले

662
0

पुणे दिनांक १९ जून (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील येरवडा येथील गोल्फ चौकात भरघाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडिस कारने दुचाकी🚴 स्वारला चिरडले आहे. दरम्यान सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची मर्सिडिस कार ही  सिरम कंपनीच्या मालकीची असल्याची माहिती मिळत आहे. तर या भीषण अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वारांचे नाव केदार चव्हाण ( वय ४८ रा. पुणे) असे आहे. ते डिलिव्हरी बाॅयचे काम करतात ते गोल्फ चौकातून विमाननगर कडे जात असताना येरवडा येथील गोल्फ चौकात भरघाव वेगाने येणाऱ्या मर्सिडिस कारने त्यांना चिरडले. दरम्यान सदरच्या अपघातात नंतर स्थानिक नागरिकांनी मर्सिडिस कार चालक याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान या अपघाताचे सीसीटीव्ही मधील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Previous articleउपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली ;ओबीसी कार्यकर्त्यां कडून धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन
Next articleचेन्नई-मुबंई इंडिगो विमान बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here