पुणे दिनांक १९ जून (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अयोध्येतील राम मंदिरात सुरक्षेसाठ ततैनात असलेल्या सुरक्षा रक्षक जवानांचा संशयास्पद परिस्थितीत बंदुकीतून गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान यात मृत्यू झालेल्या जवानांचे नाव शत्रुघ्न विश्वकर्मा असे नाव आहे. दरम्यान अचानकपणे झालेल्या या घटनेनंतर त्याला उपचारा करीता सहकारी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने ट्रामा सेंटर मध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत राम मंदिराच्या सुरक्षा साठी हे जवान तैनात करण्यात आले होते. या सुरक्षा रक्षक जवानाला अचानकपणे गोळी कशी लागली याची अद्याप माहिती समोर आली नाही.