पुणे दिनांक १९ जून (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार चेन्नई वरुन मुबंईकडे जाणा-या इंडिगो कंपनीचे विमान✈️ बाॅम्बच्या सहाय्याने उडवण्याचा धमकी चा संदेश मिळाल्यानंतर रात्री साडेदहा वाजता विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले आहे. दरम्यान जारी केलेल्या एका निवेदनात एअरलाइन्सने बाॅम्बच्या धमकी संदर्भात पुष्टी केली आहे. व या बद्दल त्यांनी सांगितले की प्रोटोकॉलचे पालन केले गेलं आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित पणे खाली उतरविण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेबाबत अधिकृत सूत्रांनद्वारे माहिती मिळाल्या नुसार चेन्नई वरुन मुंबई कडे जाणाऱ्या इंडिगो कंपनीचे फ्लाइट 6E 5149 ला बाॅम्बची धमकी मिळाली होती. हे विमान मुंबई मधील एअर पोर्टवर उतरविल्यावर क्रूनं प्रोटोकॉलचं पालन केले आणि विमानाला आयसोलेशन बेममध्ये नेण्यात आलं असं एअरलाइन्सनं सांगितले आहे. दरम्यान मागिल दोन दिवसांपासून अज्ञात व्यक्ती द्वारे ई-मेल द्वारे धमकी देण्याचे सत्र सुरू असून या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलिस👮 घेत आहेत.